३०० किलो गोवंश मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 18:13 IST2017-09-09T18:11:24+5:302017-09-09T18:13:54+5:30

संगमनेर : अवैध क त्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३०० किलो गोवंशाचे मांस व एक लाख रूपये किंमतीचे चारचाही वाहन जप्त करत एकाला ताब्यात घेतले. शहरातील अलकानगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

300 kg cattle meat seized | ३०० किलो गोवंश मांस जप्त

३०० किलो गोवंश मांस जप्त

ठळक मुद्देसंगमनेरात छापाचार चाकी वाहनासह एक ताब्यात

संगमनेर : अवैध क त्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३०० किलो गोवंशाचे मांस व एक लाख रूपये किंमतीचे चारचाही वाहन जप्त करत एकाला ताब्यात घेतले. शहरातील अलकानगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 
शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही संगमनेरात  सर्रासपणे गोवंशाची कत्तल  सुरू आहे. रिहान गुलाबनबी कुरेशी (वय. १७, रा. अलकानगर, ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉँस्टेबल आशीष आरवडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 
  अलकानगर परिसरात गोवंशाची क त्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे, फौजदार  पंकज निकम व पथकाने घटनास्थळी जात कारवाई केली. वाहनात भरलेले गोवंशाचे मांस पोलिसांनी वाहनासह जप्त के ले. कु रेशी याला ताब्यात घेत त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉँस्टेबल अण्णा वाघ तपास करीत आहेत.
 

Web Title: 300 kg cattle meat seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.