२६ जनावरांना कत्तलखान्यात नेणारा ट्रक पकडला
By Admin | Updated: May 7, 2017 14:53 IST2017-05-07T14:53:24+5:302017-05-07T14:53:24+5:30
२६ जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी सोनेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मदतीने पकडला़

२६ जनावरांना कत्तलखान्यात नेणारा ट्रक पकडला
आॅनलाइन लोकमत
जामखेड (अहमदनगर), दि़ ७ - २६ जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी सोनेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मदतीने पकडला़ ट्रकचालक फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
नान्नज-सोनेगाव रोडवरील सोनेगाव येथील खैरी नदीच्या पुलावर रविवारी पहाटेच्या सुमारास एम़ एच़ २३, डब्ल्यू. १२१ या ट्रकमधून २६ जनावरे कत्तलखान्याकडे जात असल्याचे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजले़ सोनेगाव येथील निलेश गायवळ मित्र मंडळाचे जानकीराम गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून जनावरे कोठे घेऊन चालला आहे, असे चालकाला विचारले चालकाने तेथून पळ काढला़ त्याचवेळी जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, सचिन पवार, सुजित पवार, गणेश सुळ, योगेश सुरवसे, सुनील जगताप, नाना खंडागळे, संतोष निमोणकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे जामखेड पोलिसांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तपासणी केली असता या ट्रकमध्ये १४ मोठे व लहान १२ असे एकूण २६ जणावरे आढळून आले. हा ट्रक जनावरांसह जामखेड पोलीस ठाण्यात आणून ट्रक चालकावर पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने यांच्या फिर्यादीवरुन आरोपी ट्रक चालक जबीर (पुर्ण नाव माहीत नाही, रा़ मोमीनपुरा, बीड), ट्रक क्लिनर अब्दुल हमीद हबीब (वय ३५, रा. बार्शी नाका बीड) व मालक सत्तार कुरेशी, (रा.मोमिनपुरा, बीड) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ हा ट्रक जनावरांना घेऊन कत्तलखान्यात चालला होता, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.