२५ लाखांच्या बक्षिसासाठी घातला गंडा!

By Admin | Updated: July 5, 2014 00:33 IST2014-07-04T23:26:26+5:302014-07-05T00:33:12+5:30

अहमदनगर : एका मोबाईल कंपनीचे सीम कार्ड अनेक वर्षांपासून वापरत असल्याने तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा निरोप येताच एकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

25 lakhs prize for the prize! | २५ लाखांच्या बक्षिसासाठी घातला गंडा!

२५ लाखांच्या बक्षिसासाठी घातला गंडा!

अहमदनगर : एका मोबाईल कंपनीचे सीम कार्ड अनेक वर्षांपासून वापरत असल्याने तुम्हाला २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा निरोप येताच एकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. समोरचा जसा बोलत राहिला, तसा तो करत गेला आणि शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे गेला. २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविण्यासाठी त्याने ६७ हजार रुपये बँकेत भरले. आणखी पैशांची मागणी होऊ लागल्यावर फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर त्याचे डोळे उघडले. समोरच्यांची पैसे कमविण्याची भन्नाट आयडिया पाहून त्याचे डोकेही संतापले.
नगर शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. झालेला प्रकार ज्यांची फसवणूक झाले ते परप्रांतीय कामगार रामप्रकाश मोर्य (वय २८, रा. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यासमोर) यांनीच ‘लोकमत’ला सांगितला. याबाबत त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे. मात्र या फसवणुकीच्या प्रकाराला आम्ही काहीच करू शकत नाहीत, असे उत्तर त्यांना पोलिसांकडून मिळाले.
एका मोबाईलवरून एका व्यक्तीने त्यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याची बातमी दिली. अनेक वर्षांपासून तुम्ही एका कंपनीचे सीमकार्ड वापरत आहात. त्यामध्ये भाग्यवान विजेता म्हणून तुमची निवड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बँक आॅफ बडोदामध्ये २२ हजार रुपये भरले. लकी ड्रॉचा पिनकोड लॉक आहे. तो ओपन करण्यासाठी ४५ हजार भरण्यास सांगितले आणि मोर्य यांनी बँक आॅफ महाराष्ट्राच्या एम.आय.डी.सी.मधील शाखेतून सांगितलेल्या खात्यावर पैसे भरले. हे पैसे मिळाल्यानंतर दुपारी झालेल्या संभाषणामध्ये त्यांनी बक्षिसाची फाईल आयकर विभागाकडे सोपविण्यात आली असून त्यांना देण्यासाठी ५५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी झालेला प्रकार बँक अधिकाऱ्यांना सांगितला. यावेळी मोर्य यांचे डोळे उघडले. त्यांनी अनेकवेळा संबंधित मोबाईलवर संपर्क केला, मात्र समोरच्या व्यक्तीचा मोबाईल बंद झाला होता. संबंधित खात्याची चौकशी केली असता खात्यावरील सर्व पैसे काढून घेण्यात आले होते. मोर्य हे उत्तरप्रदेशातून असून एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करतात. सदरचा मोबाईल बिहारमधून आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवस कष्ट करून केलेली कमाई एकाच दिवसात गेल्याने त्यांना खूप वाईट वाटले. (प्रतिनिधी)

Web Title: 25 lakhs prize for the prize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.