फॉर्च्युनरमधील विनापरवाना २५ लाखाची दारु पोलिसांनी पकडली
By Admin | Updated: May 9, 2017 15:35 IST2017-05-09T15:35:58+5:302017-05-09T15:35:58+5:30
फॉर्च्युनरमधून विनापरवाना २५ लाखाची विदेशी दारु पोलिसांनी पकडली. आज दुपारी नगर शहरात ही कारवाई करण्यात आली.

फॉर्च्युनरमधील विनापरवाना २५ लाखाची दारु पोलिसांनी पकडली
अ मदनगर, दि. ९ -फॉर्च्युनरमधून विनापरवाना २५ लाखाची विदेशी दारु पोलिसांनी पकडली. आज दुपारी नगर शहरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाईपलाइन रोडवरील संदीप वाईन येथून फॉर्च्युनर कार मधून विनापरवाना विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पाईपलाईन रोड येथे सापळा लावण्यात आला. त्यामध्ये ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यात विनापरवाना विदेशी दारूचे बॉक्स सोनई येथे मधुबन हॉटेलमध्ये विक्री करिता जात असल्याचे चौकशीदरम्यान समजले. विदेशी दारूचे बॉक्स व एम.एच १७ ए.झेड. - १७१७ क्रमांकाची फॉच्युर्नर कार असा एकूण २५ लाथ ९१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंदन बबनराव नलावडे ( धनगरवाडी, सोनई ),भगवंतराव गुलाबराव गडाख (सोनई ता. नेवासा.),संदीप वसंत बोरुडे (अ. नगर) यांच्याविरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.