जिल्ह्यात २४०० कोरोना सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:24+5:302021-06-26T04:16:24+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ३९२ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, ...

2400 corona active patients in the district | जिल्ह्यात २४०० कोरोना सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात २४०० कोरोना सक्रिय रुग्ण

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ३९२ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३७४ नवीन रुग्णांची भर पडली, तर ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३८ आणि अँटिजन चाचणीत २१८ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १, अकोले १, कर्जत २, नगर ग्रा. ५, पारनेर १, पाथर्डी १, संगमनेर ६ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६, अकोले २, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रा. ११, नेवासा १२, पारनेर ६, पाथर्डी १६, राहाता ७, राहुरी १८, संगमनेर १३, शेवगाव १९, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत २१८ जण बाधित आढळले. मनपा १, अकोले ६, जामखेड २५, कर्जत २२, कोपरगाव १९, नगर ग्रा. ८, नेवासा १०, पारनेर ४८, पाथर्डी १४, राहाता ७, राहुरी १०, संगमनेर ११, शेवगाव ११, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर २ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-------------

बरे झालेली रुग्णसंख्या : २,६९,८५७

उपचार सुरू असलेले रुग्ण : २३९२

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५८३०

एकूण रुग्णसंख्या : २,७८,०७९

Web Title: 2400 corona active patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.