दिवसभरात २३२ जण कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:34+5:302020-12-13T04:35:34+5:30
अहमदनगर: जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २३२ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर बरे झाल्याने ३०७ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १३३८ ...

दिवसभरात २३२ जण कोरोना बाधित
अहमदनगर: जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २३२ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर बरे झाल्याने ३०७ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १३३८ जणांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची आणि उपचार घेणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ६६ हजार २३३ इतकी झाली आहे, तर आतापर्यंत ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७८, आणि अँटीजेन चाचणीत ८० रुग्ण बाधीत आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६४), कोपरगाव (१४), नगर ग्रामीण (२६), नेवासा (१७), पारनेर (२०), पाथर्डी (७), राहाता (१४), संगमनेर (३४), शेवगाव (१६), श्रीरामपूर (७), अकोले (५), राहुरी (९), जामखेड (२), कर्जत (७), श्रीगोंदा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.