केडगावच्या हरिनाम सप्ताहाची २१ वर्षांची परंपरा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:35+5:302020-12-22T04:20:35+5:30
केडगाव : कोरोनाने देशभर हाहाकार झाल्याने त्याचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केडगावातील मागील २१ ...

केडगावच्या हरिनाम सप्ताहाची २१ वर्षांची परंपरा खंडीत
केडगाव : कोरोनाने देशभर हाहाकार झाल्याने त्याचा परिणाम धार्मिक कार्यक्रमांवर झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केडगावातील मागील २१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रद्द केल्याची माहिती माउली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष महाराज सूर्यवंशी यांनी दिली. दहा वारकऱ्यांच्या उपस्थतीतच हा सप्ताह साध्या पद्धतीने होईल.
२१ वर्षांपासून दरवर्षी माउली प्रतिष्ठान वारकरी सेवा संघ केडगाव येथील ग्रामस्थ यांच्या मदतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते. यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून काकड आरती, सात ते आठ विष्णुसहस्रनाम, आठ ते बारा गाथा पारायण, दुपारी तीन ते पाच संतचरित्र, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असायची. या सप्ताहात केडगावातील व आसपासच्या खेडेगावातील हजारो भाविक दुपारी व रात्री श्रवण करण्यासाठी येत असत. ही परंपरा खंड पडू नये यासाठी केडगावातील वैष्णवनगर येथील विठ्ठल मंदिरात नेहमीच्या वेळेस २५ डिसेंबरपासून मोजक्याच दहा वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत पहाटे काकड आरती, नामदेव गाथा पारायण, हरिपाठ होईल. काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होणार आहे.