२१ जणांना घरी सोडले.... दहा जण आज नवे बाधित, ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:05 IST2020-07-02T13:02:45+5:302020-07-02T13:05:00+5:30
नवे आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

२१ जणांना घरी सोडले.... दहा जण आज नवे बाधित, ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर नवे १० जण बाधित आढळून आले आहेत.
नवे आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
आज जिल्ह्यातील ५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. सध्या एकूण नोंद रुग्ण संख्या ५१० इतकी झाली आहे.
२१ जणांना घरी सोडले, त्यात नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे. दरम्यान आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज जिल्ह्यातील २१ रुग्ण बरे झाले. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.