पिंपरी कोलंदर येथे २०८ जणांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:47+5:302021-05-07T04:21:47+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथे २९८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तालुक्यात प्रथमच एकावेळी २०८ डोसेस ...

पिंपरी कोलंदर येथे २०८ जणांना कोरोना लस
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथे २९८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
तालुक्यात प्रथमच एकावेळी २०८ डोसेस उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. कोरोना लस मिळाल्याबद्दल सरपंच सोनाली बोबडे, उपसरपंच मनोहर शिंदे, धोत्रे महाराज, सेवा संस्था अध्यक्ष निवृत्ती ओहोळ यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. यासाठी डॉ. सचिन जगताप, पूजा लोखंडे, आरोग्यसेविका सविता रंधवे, आरोग्यसेवक गोकुळ जाधव, दादा पवार, आशासेविका भाग्यश्री काळे, स्वाती दिवटे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी माजी सरपंच रामचंद्र बोबडे, माजी अध्यक्ष तुळशीदास बोबडे, काका बोबडे, मोबीन शेख, दिलीप बोबडे, एकनाथ पवार, ग्रामसेवक वामन खाडे, भाऊसाहेब वाघ आदी उपस्थित होते.