कोपरगावात बुधवारी १९९ बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:27+5:302021-04-08T04:21:27+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात बुधवारी १९९ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा ८४५ वर गेला असून डाऊच येथील ...

कोपरगावात बुधवारी १९९ बाधित रुग्ण आढळले
कोपरगाव : शहरासह तालुक्यात बुधवारी १९९ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा ८४५ वर गेला असून डाऊच येथील ७५ वर्षीय महिला व ब्राह्मणगाव येथील ७७ वर्षीय पुरुष अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी रेपिड अँटिजेन किटद्वारे २२५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८१ व्यक्ती बाधित आढळल्या; तसेच खासगी लॅब अहवालात २४, तर नगर येथील अहवालात ९४ असे एकूण तब्बल १९९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच १०१ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले; तर आत्तापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.