शेडगावमधील १९८ कुटुंबांना मिळाला घरकुलाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:21+5:302021-04-15T04:19:21+5:30
शेडगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार असून माजी सरपंच विजय शेंडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. गरिबांना ...

शेडगावमधील १९८ कुटुंबांना मिळाला घरकुलाचा लाभ
शेडगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार असून माजी सरपंच विजय शेंडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. गरिबांना छप्परमुक्त करण्यासाठी लक्ष घातले.
प्रधान मंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत ३ कोटी ३० लाख ६६ हजार खर्च करून गेल्या पाच वर्षांत १९८ घरकुले बांधली. यामध्ये लाभार्थी नागरिकांनी आपले योगदान दिले. त्यामुळे घरकुलांचा दर्जा चांगला आहे. अशोक शेंडे त्यांचे बंधू व वडिलांनी दोन मजली घरकूल बांधून जागेची बचत केली.
............
आता २७० घरकुले मंजूर
माजी सरपंच विजय शेंडे त्यांच्या सहकाऱ्यांनी महाआवास विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान व रमाई आवास योजनेतून १९८ घरकुले बांधून दिली. आता ड योजनेत २७० घरकुले मंजूर झाली आहेत. ही घरकुले गोरगरीब कुटुंबांना मिळणार आहेत.
- संध्या शेंडे, सरपंच, शेडगाव
.........
माझ्या कुटुंबांची घर बांधण्याची परिस्थिती नव्हती, पण पंतप्रधान आवास योजनेतून मला घरकूल मिळाले. माझे घरकुलांचे स्वप्न साकार झाले.
-संतोष शेंडे, लाभार्थी
१४शेडगाव