सामूहिक विवाहात १९ जोडपी विवाहबध्द
By Admin | Updated: March 5, 2024 16:30 IST2014-05-17T00:38:37+5:302024-03-05T16:30:40+5:30
पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली.

सामूहिक विवाहात १९ जोडपी विवाहबध्द
पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली. मंगलमय वातावरण व हजारो वºहाडींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. अळकुटी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने गुरूवारी दुपारी अळकुटी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मंडपातच साखरपुडा, हळद व इतर सामूहिक विधी झाल्यानंतर वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी गोरज मुहुर्तावर एकोणीस जोडप्यांचे विवाह झाले. यावेळी आमदार विजय औटी, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे, संतोष काटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठुबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान शिंदे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)