उखलगावातील शिबिरात १८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:45+5:302021-05-17T04:19:45+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याची मागणी सरपंच कविता चंदन यांची केली होती. या मागणीचा ...

उखलगावातील शिबिरात १८ पॉझिटिव्ह
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याची मागणी सरपंच कविता चंदन यांची केली होती. या मागणीचा विचार करून पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुरुवारी उखलगाव येथे सार्वजनिक कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी १५० नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी काही रूग्ण भाळवणी, कोळगाव, पिंपळगाव पिसा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर, परिचारिका सुशीला जाधव, कविता गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. उखलगाव येथील वयोवृद्ध नागरिकांच्या लसीकरणासाठी एकदा शिबिर घेण्यात आले. त्यावेळी काहीजण वंचित राहिले. त्यामुळे उखलगाव येथे पुन्हा एक दिवसासाठी लसीकरण शिबिर घेण्याची गरज आहे, अशी मागणी सरपंच कविता चंदन यांनी केली.