कोपरगावात १७ हजारांची दारू जप्त; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:24+5:302021-04-08T04:21:24+5:30
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथकाने मंगळवारी (दि.६) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुणतांबा फाटा, जेऊर ...

कोपरगावात १७ हजारांची दारू जप्त; तिघांवर गुन्हा
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथकाने मंगळवारी (दि.६) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुणतांबा फाटा, जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसर, अशा तीन ठिकाणी हॉटेलशेजारी अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईत योगेश आत्माराम जगताप (वय ३५), विजय जगन्नाथ भाबड (वय ४५, दोघे रा. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव) व ललित नंदू घोडे (वय ३२, रा. कांचनवाडी, कोकमठाण, ता. कोपरगाव) यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १७ हजार ३३४ रुपयांची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे व पोलीस नाईक ए.एम. दारकुंडे करीत आहेत.