शहरासह उपनगरांत १७ विसर्जन कुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:42+5:302021-09-17T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिका प्रशासनाने बाप्पांच्या निरोपाची तयारी केली असून, शहरासह उपनगरांत १७ ठिकाणी विसर्जन कुंड तयार ...

शहरासह उपनगरांत १७ विसर्जन कुंड
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिका प्रशासनाने बाप्पांच्या निरोपाची तयारी केली असून, शहरासह उपनगरांत १७ ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांनी एकाच कुंडावर गर्दी न करता जवळच्या कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात या ठिकाणी असतील विसर्जन कुंड
- बोल्हेगाव येथील भारत बेकरी चौक
- वडगाव गुप्ता रोडवरील मयूर पार्क
- तपोवन रोडवरील नाना चौक
- निर्मलनगर येथील साईमंदिर
- पाइपलाइन रोडवरील यशोदानगर विहीर
- बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यान
- गंगा उद्यान येथील मिस्किनमळा
- नेप्तीनाका येथील बाळाजी बुवा विहीर
- कल्याण रोडवरील सीना नदीपात्र
- भिंगारनाला येथील सारसनगर पुलाशेजारी
- बुरूडगाव रोडवरील साईनगर उद्यान
- स्टेशनरोडवरील शिवनेरी चौक
- केडगाव लिंक रोडवरील क्रांती चौक
- केडगाव मोतीनगर येथील बुद्धविहाराशेजारी
- केडगाव देवी मंदिर परिसरात
- केडगाव येथील मधुर मिलन मंगल कार्यालयाशेजारी
- गोविंदपुरा येथील मारुती मंदिर परिसरात