कोपरगावच्या महाअभियानात १६७ जणांनी जोडलं रक्तांच नातं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:40+5:302021-07-12T04:14:40+5:30
कोपरगाव : लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव येथे आयोजित रक्तदान महाअभियानात १६७ दात्यांनी ...

कोपरगावच्या महाअभियानात १६७ जणांनी जोडलं रक्तांच नातं !
कोपरगाव : लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव येथे आयोजित रक्तदान महाअभियानात १६७ दात्यांनी रक्तदान केले. हे कोपरगावातील आजवरचे सर्वांत उच्चांकी रक्तदान शिबिर ठरले आहे.
स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मित्र फाउंडेशनचे संस्थापक सदस्य स्व. राहुल टेके पाटील व स्व. शरद दवंगे यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि.११) कोपरगाव येथील मराठा पंच कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी स्व. जवाहरलालजी दर्डा, स्व. राहुल टेके पाटील व स्व. शरद दवंगे यांच्या प्रतिमेचे पूजन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, उपमहाव्यवस्थापक संजय शिंदे, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळे, सुरक्षा अधिकारी संजय सरोदे, माजी सभापती मछिंद्र टेके, सुनील देवकर, साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष संजय टेके, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे, संचालक फकीरराव बोरनारे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, ‘लोकमत'चे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार फकीर टेके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, विशाल आढाव, विजय ठाणगे, नरेंद्र ललवाणी, राजेंद्र गायकवाड, विजय गायकवाड, चंद्रकांत पाटील, संजय जाधव, अशोक गजभिव, दौलत वाईकर, प्रकाश गोर्डे, विशाल गोर्डे, अनिल गोरे, राहुल शिंदे, प्रशांत संत, सागर जाधव, मोहन उकिरडे, मछिंद्र मुरार, चेतन खुबानी, राजू चांडे, शुभम लकारे, प्रा. रवींद्र जाधव, जालिंदर टेके, अनुराग टेके, अशोक निळे, सुमित दरेकर आदी उपस्थित होते.
शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँकेच्या डॉ. नीता पाटील, डॉ. झिया शेख, डॉ. हर्षल आढाव, विराज गायकवाड, सुरैया शेख, रेणुका औटी, उस्मान शेख, दुर्गा पगारे, सुनील शिरसाठ, सनी धीवर, मोहित जाधव, अरुण अत्तार, मेघा जाधव, सनी कांबळे, योगेश पगारे, ऋषिकेश पाटील तसेच अमृत ब्लड बँकेचे डॉ. स्वाती घोडके, डॉ. श्वेता वानखेडे, डॉ. बाळासाहेब गव्हाणे, विशाल जैन, स्वप्नील ठोंबरे, शुभम गवळी, कोमल खंडागळे, डॉ. श्वेता वानखेडे, अजय सांळके, सुबोध नरवडे, मालेश्वरी गव्हाणे, कैलास राठोड यांनी सहकार्य केले.
शिबीर यशस्वीतेसाठी मित्र फाउंडेशनचे नवनाथ सोमासे, कुमार बागरेचा, सनी शेळके, गजू कोतकर, अमृत काकड, साकेत नरोडे, अभिषेक आढाव, संकेत मंडलिक, नंदन घाडगे, विक्रांत कुदळे, सौरभ होते, हर्षल जोशी, लक्ष्मण बागुल, नितीन सावंत, हर्षल नरोडे, पंकज आढाव, मुकेश ठोळे, अमर नरोडे, आशिष कांबळे, बाळू मेहताने, विशाल लकारे, गोरख साळुंके आदींनी परिश्रम घेतले.