नगर तालुक्यात १६२ कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:37+5:302021-01-17T04:18:37+5:30

अहमदनगर : राज्यातील अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना, नगर जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत ...

162 hens die in Nagar taluka | नगर तालुक्यात १६२ कोंबड्यांचा मृत्यू

नगर तालुक्यात १६२ कोंबड्यांचा मृत्यू

अहमदनगर : राज्यातील अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना, नगर जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत नगर तालुक्यातील आठवड तसेच निंबळक परिसरात १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला.

आठवड येथे ११६ व निंबळक येथे शुक्रवारी ४६ कोंबड्या मरण पावल्या. नगर तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने दोन्ही गावात तातडीने भेट दिली. पक्ष्यांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.

बाराबाभळी येथे साळुंकी मृतावस्थेत आढळली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात पोल्ट्रीफार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर शहराजवळ पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निंबळक येथे शुक्रवारी राम चव्हाण यांच्या ४६ कोंबड्या मृण पावल्या. त्यातील पाच कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल अद्याप मिळाला नाही.

Web Title: 162 hens die in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.