८५ वर्षांच्या आजीबाईसह जिल्ह्यातील १६ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:21 IST2020-07-04T11:21:44+5:302020-07-04T11:21:52+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले आहेत. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे.

16 patients in the district, including 85-year-old grandmother, overcome corona | ८५ वर्षांच्या आजीबाईसह जिल्ह्यातील १६ रुग्णांची कोरोनावर मात

८५ वर्षांच्या आजीबाईसह जिल्ह्यातील १६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर : जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले आहेत. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ०५, संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येकी तीन, राहाता तालुक्यातील ०२, पारनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

आज बºया झालेल्या रुग्णासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णालयात १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात १५ रुग्ण या आजाराने दगावले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या ५४४ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Web Title: 16 patients in the district, including 85-year-old grandmother, overcome corona