रांधे येथे १४० नागरिकांना मिळाली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:13+5:302021-05-01T04:20:13+5:30
अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रांधे गावातील उपकेंद्रात शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी ...

रांधे येथे १४० नागरिकांना मिळाली कोरोना लस
अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रांधे गावातील उपकेंद्रात शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी १४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती उपसरपंच संतोष काटे यांनी दिली. यावेळी उत्तम गायकवाड, संतोष लामखडे, विनोद फापाळे, नवनाथ कारभारी आवारी, साईनाथ झिंजाड, सुरेशआप्पा आवारी, संतोष भास्कर आवारी, शाकिर तांबोळी, हौश्याभाऊ आवारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रमोद गायकवाड, अमोल शिंदे यांनी प्रशासनास सहकार्य करत स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली.
यावेळी सरपंच अरुण आवारी, उपसरपंच संतोष काटे, रामदास भोसले, देवराम आवारी, बाळासाहेब आवारी, होश्याभाऊ साबळे, लक्ष्मण साबळे, भगवान पावडे, गोविंद आवारी, सबाजी शेटे, संतोष साबळे, अशोक आवारी आदी उपस्थित होते. लसीकरणास ग्रामसेवक शेळके, आरोग्य विभागाच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी सुवर्णा सुर्वे, गीतांजली झावरे, आरोग्यसेविका वैशाली पिंपरकर, आशा कार्ले, आरोग्यसेवक किरण पाटील, आशासेविका सायरा तांबोळी, अनिता आवारी, मदतनीस मंगल आवारी यांचे विशेष सहकार्य लाभले.