१४ वर्षीय मुलीवर तिघांचा अत्याचार

By Admin | Updated: May 17, 2017 15:39 IST2017-05-17T15:39:42+5:302017-05-17T15:39:42+5:30

एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे घडली़

The 14-year-old girl tortured three | १४ वर्षीय मुलीवर तिघांचा अत्याचार

१४ वर्षीय मुलीवर तिघांचा अत्याचार

आॅनलाईन लोकमत
श्रीरामपूर, दि़ १७ - एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे घडली़ याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे़ या फिर्यादीनुसार आरोपी रामराव गिरनारे, राहुल सुभाष शिरसाठ, सचिन अण्णा निकम (सर्व रा़ खंडाळा) यांनी पाच महिन्यांपासून पीडितेवर वारंवार अत्याचार केला़ तसेच याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली़ मुलीच्या फिर्यादीवरुन तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली़

Web Title: The 14-year-old girl tortured three