हॉटेल व्यावसायिकाला १४ लाखांचा ऑनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:23+5:302021-02-05T06:39:23+5:30
वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींच्या टोळीतील एकाने भालेकर यांना संपर्क करून त्यांच्याशी मैत्री केली. आमची परदेशात कंपनी असून आम्हाला ...

हॉटेल व्यावसायिकाला १४ लाखांचा ऑनलाइन गंडा
वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींच्या टोळीतील एकाने भालेकर यांना संपर्क करून त्यांच्याशी मैत्री केली. आमची परदेशात कंपनी असून आम्हाला भारतातून हर्बल ऑॅइल खरेदी करावयाचे आहे. त्यासाठी तुम्ही मध्यस्थी म्हणून काम करा. यातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील, असे आमिष आरोपींनी दाखविले. त्यानंतर आरोपींनीच सुचविलेल्या कंपनीतून प्रथम भालेकर यांना ऑॅइल घेण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून विविध खात्यांवर १४ लाख १७ हजार ५०० रुपये भरून घेतले. यात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भालेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्यासह हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, विशाल अमृते आदींच्या पथकांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी पुणे येथील असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. पथकाने आरोपींचा शोध सुरू केला आहे.