११८ उमेदवारांची दांडी

By Admin | Updated: June 21, 2014 00:45 IST2014-06-20T23:26:50+5:302014-06-21T00:45:54+5:30

अहमदनगर: पावसामुळे पोलिस मैदानावर पाणी साचल्याने लेखी परीक्षेला सकाळी दोन तास उशिराने सुरुवात झाली़ त्यामुळे भर उन्हात उमेदवारांना पेपर सोडावा लागला

118 candidates of Dandi | ११८ उमेदवारांची दांडी

११८ उमेदवारांची दांडी

अहमदनगर: पावसामुळे पोलिस मैदानावर पाणी साचल्याने लेखी परीक्षेला सकाळी दोन तास उशिराने सुरुवात झाली़ त्यामुळे भर उन्हात उमेदवारांना पेपर सोडावा लागला असून, लेखी परीक्षेसाठी दोन १३८ उमेदवार हजर होते़ तर ११८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली़
पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे़ येथील पोलिस परेड मैदावर ही प्रक्रिया राबविण्यात आली़ भारतीचा शुक्रवारी शेवटचा ठप्पा होता़ सकाळी सात वाजता १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ एक दिवस आधी गुरुवारी सायंकाळी मैदानावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती़ तशा सूचनाही उमेदवारांना आधीच देण्यात आल्या होत्या़ त्यामुळे गुरुवारी रात्रीच उमेदवार शहरात दाखल झाले होते़ ते सकाळी सात वाजेच्या सुमारास मैदानावर दाखल झाले़ परंतु गुरुवारी रात्रीच शहरात पाऊस झाला़ या पावसात मैदानावर आखलेल्या रेषा पुसल्या गेल्या़ तसेच काही ठिकाणी डबके साचले होते़ त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली़ उमेदवार आले़ पण बैठक व्यवस्था नव्हती़ पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा रेषा आखून उमेदवारांना परीक्षेसाठी मैदानावर प्रवेश दिला गेला़ मात्र ही सर्व व्यवस्था करण्यासाठी दोन तास लागले़ त्यामुळे लेखी परीक्षा दोन तास उशिराने सुरू झाली़ परिणामी उन्हाच्या तडाख्यात उमेदवारांना परीक्षा द्यावी लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़
लेखी परीक्षेसाठी दोन हजार २५६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ मात्र परीक्षेसाठी दोन हजार १३८ उमेदवार हजर होते़ उर्वरित ११८ उमेदवार उपस्थित नव्हते़ उपस्थित असलेल्या उमेदवारांना १०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली़ त्याबरोबरच पॅडचीही व्यवस्था करण्यात आली होती़ मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांनाच परीक्षेला बोलविण्यात आले होते़ परंतु मैदानी चाचणी कमी गुण असलेल्यांनी परीक्षेसाठी गर्दी केल्यामुळे गोंधळात भर पडली़ भरती निवड समितीने उमेदवारांच्या गुणांची तपासणी करून कमी गुण असणाऱ्यांना बाहेर काढले़ पूर्व सूचना न देताच काहींना परीक्षेस बसू न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़ काहींनी तक्रारीही केल्या़ तक्रारदारांच्या तक्रारींचे पोलिस भारती निवड समितीने निवारण केले़ परीक्षेसाठी परिसरात मोठा बंदोबस्त होता़ यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते़
पॅड डोक्यावऱ़़
उमेदवारांना परीक्षेसाठी मैदानावर बसविण्यात आले़ परंतु बराचवेळ होऊनही परीक्षा सुरू झाली नाही़ त्यामुळे उमेदवारांनी पॅड डोक्यावर घेऊन उन्हापासून बचाव केला़

Web Title: 118 candidates of Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.