११० हॉस्पिटलची बांधकामे बेकायदा
By Admin | Updated: October 29, 2014 23:58 IST2014-10-29T23:50:57+5:302014-10-29T23:58:13+5:30
अहमदनगर: नगर शहरातील ११० हॉस्पिटलची बांधकामे बेकायदा असून काहींनी परवानगीही घेतलेली नाही. अशा ८७ हॉस्पिटल चालकांना महापालिकेने नोटिसा दिल्या

११० हॉस्पिटलची बांधकामे बेकायदा
अहमदनगर: नगर शहरातील ११० हॉस्पिटलची बांधकामे बेकायदा असून काहींनी परवानगीही घेतलेली नाही. अशा ८७ हॉस्पिटल चालकांना महापालिकेने नोटिसा दिल्या असून उपायुक्त अजय चारठाणकर यांच्यासमोर त्यावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर कायद्याचा सर्वांगीण विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कायदेशीर नियमानुसार सुनावणी होईल, असे उपायुक्त चारठाणकर यांनी स्पष्ट केले आहे.
नगर शहरात हॉस्पिटल बांधताना बांधकाम परवानगी घेतली नाही, ज्यांनी परवानगी घेतली त्यांनी परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केले. काहींनी निवासी परवाना घेऊन तेथेच हॉस्पिटल सुरू केले. काहींनी बाह्य रुग्ण तपासणीची परवानगी घेऊन हॉस्पिटल सुरू केल्याची बाब तीन वर्षापूर्वी केलेल्या सर्व्हेत आढळून आली होती. त्यावेळी ९६ हॉस्पिटलचे सर्व्हेक्षण झाले. त्यातील ५० हॉस्पिटल चालकांना नोटिसा दिल्या असून त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे बजावले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील हॉस्पिटलचे पुन्हा सर्व्हेक्षण केले. त्यात २२ नवीन हॉस्पिटलची बांधकामे नियमबाह्य असल्याचे आढळले. या हॉस्पिटल चालकांना सुनावणीसाठी बोलविले आहे. (प्रतिनिधी)