खटोड पतसंस्थेकडून १०१ कोरोना योद्धांना मिळाले विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:34+5:302021-05-07T04:21:34+5:30

विमा पॉलिसीच्या प्रातिनिधिक वितरणप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी बद्रीनारायण वढणे, मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी, स्थानिक वैद्यकीय ...

101 Corona Warriors get insurance cover from Khatod Credit Union | खटोड पतसंस्थेकडून १०१ कोरोना योद्धांना मिळाले विमा कवच

खटोड पतसंस्थेकडून १०१ कोरोना योद्धांना मिळाले विमा कवच

विमा पॉलिसीच्या प्रातिनिधिक वितरणप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी बद्रीनारायण वढणे, मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास चोखर, डॉ. मच्छिंद्र निर्मळ, कामगार तलाठी कैलास खाडे, पोलीस पाटील अशोक प्रधान आदी उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाले, सध्या कोरोनाची घातक अशी लाट सुरू असल्याने घरोघरी जाऊन रुग्ण शोधण्याची मोहीम आरोग्य विभाग राबवित आहे. अशा स्थितीत खटोड पतसंस्थेसह अन्य सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने कोरोना योद्धांना दिलेले विमा कवच हा उपक्रम अनुकरणीय आहे.

यावेळी पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, देवीदास देसाई, रामेश्वर ढोकणे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश पवार,डॉ. रामेश्वर राशीनकर, राम पोळ, रमेश कुटे, अशोक पवार, किशोर राऊत, मिलिंद दुधाळ, संतोष शेलार, प्रशांत शिरसाठ, प्रसाद खरात, राहुल माळवदे, प्रशांत होन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच भरत साळुंके यांनी केले, तर खटोड पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र खटोड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संचालक अभिजित राका यांनी केले.

Web Title: 101 Corona Warriors get insurance cover from Khatod Credit Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.