संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:06+5:302021-08-12T04:25:06+5:30
कोपरगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्थापनेपासून सलग १०० टक्के ...

संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा १०० टक्के निकाल
कोपरगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्थापनेपासून सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात वाणिज्य शाखेच्या सृष्टी शेलार हिने ९६. ८३ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत कोपरगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. समर्थ कुलकर्णी याने ९६ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला.
ऋषिकेश जाधवने व श्रद्धा पाटील यांनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत समर्थ कुलकर्णी याने ९६ टक्के गुण मिळवून संजीवनीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. ऋषिकेश गाडेकर, उज्ज्वल बोडखे यांनी विज्ञान शाखेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. वाणिज्य विभागात १८ तर विज्ञान विभागात १३ अशा ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माजी मंत्री व संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, तसेच प्राचार्य डाॅ.आर.एस. शेंडगे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे.