महर्षी स्कूलचा बारावीचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:12+5:302021-08-01T04:20:12+5:30
कोपरगाव : सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी ...

महर्षी स्कूलचा बारावीचा १०० टक्के निकाल
कोपरगाव : सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलचा बारावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. यात विद्यालयातील सिद्धी पंकज लोढा हिने ९६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. श्रेयश संजय बानकर द्वितीय (९० टक्के), तर खुशी अजित पारख व वैष्णवी नंदू पाठक (८३.०२ टक्के) तसेच वाणिज्य शाखेत आदिती दीपक पवार हिने ७२.०२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे.के. दरेकर यांनी कौतुक केले. जयप्रकाश पाण्डेय, स्वनिल पाटील, बाळासाहेब बढे, रवींद्र कोहकडे, राहुल काशीद, अनिता वरकड, निकिता गुजराथी, कैलास कुलकर्णी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.