हिवरे बाजार सेवा संस्थेची १०० टक्के वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:27+5:302021-04-02T04:20:27+5:30
केडगाव : आदर्शगाव हिवरे बाजारची (ता.नगर) विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सभासद व बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाली आहे. ...

हिवरे बाजार सेवा संस्थेची १०० टक्के वसुली
केडगाव : आदर्शगाव हिवरे बाजारची (ता.नगर) विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सभासद व बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाली आहे. संस्थेचे सभासद ३५० असून त्यापैकी कर्जदार सभासद २०० आहेत. एकूण वसूल रक्कम १ कोटी ९० लाख २८ हजार ५०९ आहे. सभासद पातळीवर व बँक पातळीवर १०० टक्के वसुली झाली आहे. प्रत्येक सभासदाने आपापली कर्जाची रक्कम भरून खाते नियमित करून घेतले आहे. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के वसुलीचे प्रयत्न यशस्वी ठरले.
यासाठी सोसायटी सभासदांच्या सहकार्याबरोबरच सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल ठाणगे, एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, अर्जुन पवार, जालिंदर चत्तर, दामोधर ठाणगे, अशोक गोहड, संस्थेचे सचिव कुशाभाऊ ठाणगे यांनी विशेष परिश्रम घेतले.