नगर एमआयडीसीमध्ये १०० बेडचे हॉस्पिटल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST2021-08-29T04:22:58+5:302021-08-29T04:22:58+5:30

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील अडीअडचणींसंदर्भात शनिवारी एमआयडीसी येथे उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत तटकरे बोलत ...

A 100-bed hospital will be set up in Nagar MIDC | नगर एमआयडीसीमध्ये १०० बेडचे हॉस्पिटल उभारणार

नगर एमआयडीसीमध्ये १०० बेडचे हॉस्पिटल उभारणार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील अडीअडचणींसंदर्भात शनिवारी एमआयडीसी येथे उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत तटकरे बोलत होत्या. या वेळी आमदार संग्राम जगताप, औद्योगिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, राजेश पेवाल, दिलीप अकोलकर, संजय बंदिष्टी, संतोष लांडे, योगेश गलांडे, प्रा. माणिकराव विधाते, संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे आदी उपस्थित होते.

तटकरे यांनी सांगितले की, नगर एमआयडीसीमधील १६८ भूखंड वाटपांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. यासंदर्भात मुंबई येथे बैठक बोलावून या प्रश्नावर मार्ग काढला जाईल. इतर राज्य उद्योगधंद्यांसाठी वीजदरात सवलत देत असल्याने तेथे उद्योग जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही वीज दरवाढीत कपात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आ. जगताप म्हणाले, एमआयडीसीचा कोंडलेला श्वास आता मोकळा होणार आहे. उद्योजकांवर लाखो कामगार अवलंबून असतात. स्थानिक पातळीवर ज्या अडचणी असतात त्या आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एमआयडीसीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नगरमध्ये अनेक कंपन्या येऊ पाहत आहेत त्यासाठी विस्तारीकरणाचा प्रश्न हाती घेण्यात येईल.

या वेळी प्रकाश गांधी यांनी एमआयडीसीतील उद्योजकांकडून ग्रामपंचायत टॅक्स व एमआयडीसी टॅक्स असा दुहेरी कर आकारला जातो. एमआयडीसीकडून उद्योजकांना सुविधा दिल्या जातात, परंतु ग्रामपंचायतीकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. नगर-मनमाड रस्त्याचे रुंदीकरण करावे, जिल्ह्यातील सुपा तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये जमीन अधिग्रहित होणे गरजेचे आहे, येथे मोठे उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात फळाचे उत्पादन घेत असल्यामुळे एमआयडीसीत फूड पार्क उभारण्यात यावे, अशा विविध मागण्या गांधी यांच्यासह उद्योजकांनी मंत्री तटकरे यांच्याकडे केल्या.

फोटो २८ तटकरे

ओळी- एमआयडीसी येथे उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत बोलताना उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे.

Web Title: A 100-bed hospital will be set up in Nagar MIDC