जामखेडसाठी १०० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:42+5:302021-04-02T04:21:42+5:30
जामखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. ऐनवेळी पळापळ करण्यापेक्षा १०० बेडच्या कोविड सेंटरची व्यवस्था डॉ. ...

जामखेडसाठी १०० बेडचे कोविड सेंटर
जामखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. ऐनवेळी पळापळ करण्यापेक्षा १०० बेडच्या कोविड सेंटरची व्यवस्था डॉ. अरोळे हॉस्पिटललगत करणार आहोत. तशी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी गुरुवारी दिली.
पवार यांनी डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटलला गुरुवारी भेट देऊन हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी अरोळे व डॉ. शोभा अरोळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी १०० बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात येत असलेल्या जागेची पाहणी केली. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, डॉ. अरोळे हॉस्पिटल एक वर्षापासून कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यांना शक्य तितकी मदत केली आहे. प्रशासनही औषधे, बेड उपलब्ध करणे यासाठी मदत करीत आहेत. एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केल्या, तर मनुष्यबळ योग्य पद्धतीने वापरता येईल. त्यामुळे इतरत्र काही करण्यापेक्षा येथेच सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी ३०० बेड उपलब्ध आहेत. यातील ७० ऑक्सिजनयुक्त आहेत. पाच व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. हॉस्पिटलला इतर मदतही मिळवून देऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, राहुल उगले, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, इस्माईल सय्यद, झुबेर शेख, आदी उपस्थित होते.
--
०१ जामखेड पवार
जामखेड येथील अरोळे कोविड सेंटर येथे रवी अरोळे यांच्याशी चर्चा करताना आमदार रोहित पवार.