तपासणी अहवालात सोनईत १० जण पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 11:59 IST2020-07-10T11:58:21+5:302020-07-10T11:59:14+5:30

कोरोनासदृश्य आजाराने  मंगळवारी सोनईत एका तरूणाचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाचे त्याच्या संपर्कातील २० लोकांची तपासणी केली होती.

10 positive in Sonai test report | तपासणी अहवालात सोनईत १० जण पॉझिटिव्ह 

तपासणी अहवालात सोनईत १० जण पॉझिटिव्ह 

 सोनई : कोरोनासदृश्य आजाराने  मंगळवारी सोनईत एका तरूणाचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाचे त्याच्या संपर्कातील २० लोकांची तपासणी केली होती.

गुरूवारी उशीरा त्यांचे अहवाल आले आहेत. त्यापैकी दहा लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  सोनईकरांबरोबर  बारा वाड्याचीही धुकधुकी वाढली आहे.

प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून  सोनई गाव बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान अहवाल प्राप्त होताच तहसीलदार रुपेश सुराणा आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सोनई येथे पुढील प्रतिबंधक कार्यवाहीसाठी सोनईला येऊन पाहणी केली.

Web Title: 10 positive in Sonai test report