काटवनात जुगार खेळणाऱ्या १० जणांना पकडले
By शेखर पानसरे | Updated: January 14, 2024 17:29 IST2024-01-14T17:28:48+5:302024-01-14T17:29:09+5:30
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काटवनात जुगार खेळणाऱ्या १० जणांना पकडले
संगमनेर : काटवनात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत १० जणांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी वाहने असा एकूण ५ लाख ६९ हजार २३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.१३) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बुवासाहेब नवले नगर येथील काटवनात करण्यात आली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेले १० जण तिरट नावाचा पत्यांचा पैसे लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. कारवाईत सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल कर्पे, रोहिदास शिरसाठ, विवेक जाधव, महिला पोलिस कॉस्टेबल स्वाती ठोंबरे यांचा समावेश होता. सहायक फौजदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत