शिर्डी विमानतळ रस्त्यासाठी दहा कोटी
By Admin | Updated: March 20, 2016 00:48 IST2016-03-20T00:46:15+5:302016-03-20T00:48:19+5:30
शिर्डी : जवळकेमार्गे शिर्डी विमानतळ ते वावी या मार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून केंद्रीय रस्ते वाहतूक मंंत्री नितिन गडकरी यांनी १० कोटी रुपये मंजूर केले

शिर्डी विमानतळ रस्त्यासाठी दहा कोटी
शिर्डी : जवळकेमार्गे शिर्डी विमानतळ ते वावी या मार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून केंद्रीय रस्ते वाहतूक मंंत्री नितिन गडकरी यांनी १० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
या रस्त्यामुळे नाशिक हे शिर्डी विमानतळास जोडले जाणार असून साईभक्तांना अतिशय जवळचा मार्ग ठरणार आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात वाकचौरे यांनी म्हटले आहे की, सततच्या पाठपुराव्यामुळे जवळकेमार्गे वावीपर्यंत २३ कि.मी. साठी हा निधी मंजूर झाला आहे. तशा आशयाचे पत्र रस्ते विकास मंत्रालयाने पाठविले आहे.
(तालुका प्रतिनिधी)