शेवगाव तालुक्यातील १ कोटीच्या रस्ता कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:44+5:302021-04-24T04:20:44+5:30
शेवगाव : २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे, या योजनेंतर्गत शेवगाव तालुक्यातील चार रस्त्यांच्या ...

शेवगाव तालुक्यातील १ कोटीच्या रस्ता कामांना मंजुरी
शेवगाव : २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे, या योजनेंतर्गत शेवगाव तालुक्यातील चार रस्त्यांच्या कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.
लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत दीड वर्षापूर्वी प्रस्तावाला मंजुरी मिळाली; परंतु निधी न मिळू शकलेल्या सर्वच कामांची मागणी करण्यात आली होती. सद्य:स्थितीत चार कामांसाठी निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये नागलवाडी येथील काशीकेदारेश्वर रस्ता खडीकरण व डांबरीकरण २५ लाख, गायकवाड जळगाव अंतर्गत हराळवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण २५ लाख, शेकटे खु. येथील काळूबाई तांडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४० लाख, भायगाव येथील बाबूराव दुकळे वस्ती ते भातकुडगाव शिव रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख आदी रस्त्यांचा समावेश आहे.