शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा परिसरात १०० ब्रास वाळू जप्त; महसूल, पोलीस प्रशासनाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:37 IST

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावात शनिवारी (दि.४ जानेवारी) रोजी १०० ब्रास अवैध वाळू साठा महसूल, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला.

जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावात शनिवारी (दि.४ जानेवारी) रोजी १०० ब्रास अवैध वाळू साठा महसूल, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पातून लोणी, बाळगव्हाण, वाकी, सातेफळ या परिसरात खैरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन वाजता सुरू केली. ही कारवाई रात्री बारा वाजेपर्यंत चालू होती. या कारवाईत तहसीलदार विशाल नाईकवाडे, निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, विठ्ठल माने, तलाठी सुखदेव कारंडे, विजय हजारे, विकास मोराळे, हरिभाऊ कुलकर्णी, भाऊसाहेब चौधरी, विजय कटारनवरे, विजय भोरे, बाळासाहेब भोगे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, महिला पोलीस व्यवहारे आदी या पथकात सहभागी झाले होते. दरम्यान,  मागील आठवड्यात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी अशीच कारवाई करून दोन ढंपर व आठ ट्रॅक्ट्रर वाळूसह जप्त केले होते. शासकीय दराने लिलाव करणार वाकी येथील गट नंबर २० मध्ये कांतीलाल किसन जगताप, गणेश सतीश जगताप यांच्या शेतात असलेली ६० ब्रास वाळू साठा, बाळगव्हाण येथे २५ ब्रास वाळूसाठा, खर्डा येथे १५ ब्रास साठा असा सुमारे १०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला वाळूसाठा तहसील कार्यालयाच्या आवारात आणला आहे. तो शासकीय दराने लिलाव करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारी