शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

झेन कथा : टूथब्रश आणि ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 03:28 IST

माझ्या गुरुंना मी एक प्रश्न विचारला होता. मी म्हणालो, ‘मला एक समजत नाही. मी बघतो सगळीकडे की लोक असे जीवन जगतात

धनंजय जोशीमाझी मुलगी डेंटिस्ट आहे. तिला तिच्या क्लिनिकमध्ये नवीन नवीन गोष्टी मिळत असतात. अलीकडेच तिने मला एक इलेक्ट्रिक ब्रश आणून दिला. त्या ब्रशसाठी तुमच्या फोनवर डाऊनलोड करण्याचे एक अ‍ॅप असते, तेही तिने मला डाऊनलोड करून दिले. आता हे अ‍ॅप कशासाठी? तर तुम्ही दात घासताना फोन तोंडासमोर धरायचा म्हणजे मग ते अ‍ॅप सांगते, की तुम्ही बरोबर सगळे दात घासलेत की नाही? आणखी एक सोय म्हणजे दर दिवसाची माहिती फोनमध्ये साठवून ठेवली जाते. मी एका वीकेंडला बाहेरगावी गेलो होतो तेव्हा तो ब्रश घरी विसरून गेलो. त्यामुळे दोन-तीन दिवस वापरला गेला नाही. घरी परत आल्यावर पाहिले, तर माझ्या इनबॉक्समध्ये त्या टूथब्रशकडून एक ई-मेल आली होती : ‘तुम्ही गेले तीन दिवस दिसला नाहीत. आपली चुकामुक झाली - वी मिस्ड यू!’ - मला हसावे की रडावे ते कळेना!

नंतर विचार आला मनामध्ये! आपण टूथब्रशकडून ई-मेल आल्यावर आधी जरा घाबरूनच जातो; पण आपले मन आपल्याला अशा कितीतरी ‘ई-मेल्स’ सतत पाठवत असते, मात्र आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपले हव्यास, आपल्या आवडी-निवडी, आपले राग आणि लोभ ह्या सगळ्यामध्ये गुंतून आपण जीवन जगतो. मन सांगते आपल्याला की, ‘बाबा रे, हा सगळा दु:खाचा प्रकार आहे. सगळे बदलत असणारे विश्व, त्याच्यात गुंतून राहू नकोस. तुला मनाची शांती हवी तर साधनेचा हात धरून चाल!’- आपण ऐकतो का? बहुतेक नाहीच.

माझ्या गुरुंना मी एक प्रश्न विचारला होता. मी म्हणालो, ‘मला एक समजत नाही. मी बघतो सगळीकडे की लोक असे जीवन जगतात ज्यामध्ये त्यांनी थोडी जरी साधना केली तर त्यांना कितीतरी मन:शांती मिळून जाईल. मग ते का करीत नाही?’ माझे गुरु हसून म्हणाले, नॉट इनफ सफरिंग यट.. अजून त्यांनी पुरेशा दु:खाचा अनुभव घेतलेला नसतो, म्हणून!’ मला वाटले, ते ठीकच आहे; पण आपण तरी कशाला थांबावे तेवढ्यासाठी?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक