शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

तैसी चिंता अपार वाढविती निरंतर ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 3:48 PM

विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगात प्रत्येक मानव प्राणी हा सतत चिंताग्रस्त असतो. सुखात असो की दुःखात, चिंता ही माणसाचा पाठलाग कधीच सोडत नाही. आपण म्हणाल, चिंता म्हणजे तरी काय.? जी वस्तू आपणाजवळ नसेल त्या वस्तूची प्राप्ती झाली नाही तर, अंतरंगात जी वृत्ती निर्माण होते तिला चिंता असे म्हणतात. सज्जनहो.! चिंता ही एक मानसिक विकृती आहे. विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते. चिंता या विकृतीला पूर्ण विराम कधीच नाही. अमर्याद विषयोपभोगाने ती सतत वाढत जाते.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -या चि एका आयती तयाचिया कर्म प्रवृत्तीआणि जिणयाहि परौती वाहवी चिंतातैसी चिंता अपार वाढविती निरंतरजीवी सुनी असार विषयादिक

चिंतेचे साधारण दोन प्रकार आहेत.1)सांसारिक चिंता व2)अध्यात्मिक चिंता 

संसारातील चिंता ही ज्याचे त्यालाच निवारण करावी लागते. निवारण झाली तरी ती परत निर्माण होणारच नाही याची खात्री देता येत नाही. अध्यात्मिक चिंता मात्र संतकृपेने किंवा सद्गुरुकृपेने निवारण होते व परत चिंता शिल्लक राहातच नाही. खरं तर परमेश्वराचा निस्सीम भक्त कधी ऐहिक चिंताच करत नाही कारण विषयोपभोगाची प्राप्ती ही इच्छेवर अवलंबून नसून ती आपल्या पूर्वकर्मानुसार अवलंबून असते, याची जाणीव हरिभक्ताला असते. त्यामुळे तो विषयोपभोगाच्या संदर्भात उदासीन असतो.

तुकाराम महाराज म्हणतात -ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान 

हीच त्याची मनोवृत्ती असते. हरिभक्ताच्या चिंतनाचा, प्रेमाचा, विषयच भगवंत असल्यामुळे ऐहिक विषयांचे चिंतन करण्यास त्यास वेळ कुठे असतो..?  भक्ताची ही अनन्यता, निष्ठा, भाव, बघून परमेश्वर इतका संतुष्ट होतो की त्याची संसारिक जबाबदारी देखील देवालाच पार पाडावी लागते मात्र अनन्य भक्त असेल तरच हे घडणे शक्य आहे.

तुकोबा म्हणाले -

माझी सर्व चिंता आहे विठोबासीमी त्याच्या पायाशी न विसंबे

साम्राज्यज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

पै सर्व भावेसी उखिते जो वोपिले मज चित्तेजैसा गर्भ गोळु उद्यमाते कोणाही नेणे

ज्याप्रमाणे आईच्या गर्भातील मूल सर्वार्थाने आईशी अनन्य असते. किंवा पतिव्रता स्त्री पतीशी अनन्य असते. सूर्याची किरणें जशी सूर्याशी अनन्य असतात. तितका भक्त जर देवाशी अनन्य असेल तर

मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बहारीचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याचीच सदैव चिंता असते परंतु जगाचा पालनकर्ता आपल्या जवळ असतांना तो भक्ताची उपेक्षा करील का...? 

तुकाराम महाराज म्हणतात -पाषाणाचे पोटी बैसला दर्दुर

तया मुखी चारा कोण घाली

पक्षी अजगर न करी संचय

तयासी अनंत प्रतिपाळीपरमात्मा षड्गुणऐश्वर्य संपन्न असल्यामुळे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणे त्याला अशक्य नाही त्याने सुदाम देवाला सुवर्णनगरी देऊन त्याचे दारिद्र्य दूर केले. उपमन्यूस क्षीरसागर दिला. द्रौपदीची लज्जा रक्षण केली. कबीराचे शेले विणले. ज्या ज्या वेळी भक्तावर संकटे आली त्या वेळी भक्ताला संकटातून चिंतामुक्त केल्याच्या कथा पुराणात आहेत मग आपण कशाला उगाच चिंता करत बसावे..? चिंता न करणारे प्राणी सुखात जीवन जगतात ना..? 

भगवान तुलसीदास स्वामी अतिशय बहारीचे वर्णन करतात -

तुलसी मुरदें को देत है कपडा लकडी आगजिता रहकर सोस खरे सो नर बडे अभाग

निर्जीव प्रेताला देखील वेळेवर कपडा, लाकूड व अग्नी इत्यादि साहित्य देव देतो मग माणसाला जगण्याएवढे देणार नाही का.? फक्त अनन्य भक्त होता आले पाहिजे. एवढी अनन्य भक्ती साधली की माऊली वर्णन करतात -

ते एकवटुनि जिये क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हाचि तयाचि चिंतवणी मजचि पडली

म्हणोनि गा भक्ता नाही एकही चिंतातयाते मी समुध्दर्ता आथी मी सदा

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक