शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोठे मथुरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 5:40 AM

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी ...

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी संवाद साधणे ही सज्जन माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ती त्यांनी भागविलीच पाहिजे तरच समाजात सज्जन माणसांचा सुकाळ होईल. दुसऱ्या बाजूला या देशातील काही तीर्थक्षेत्रे आपल्या स्थान महात्म्याविषयी प्रसिद्ध आहेत म्हणूनच कबिराने म्हटले होते -चलों मन गंगा जमुना तीर, गंगा-जमुना निर्मल पानीशीतल होत शरीर ऽ चलो मन गंगा जमुना तीर ।शरीराला शीतलता व मनाला शांतता देणारे निर्मल स्रोत म्हणून तीर्थक्षेत्राचे महत्त्व मान्य जरी केले तरी हल्ली तीर्थाटने माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आपल्या देशातील बरीचशी मंडळी तीर्थाटनात कर्मकांड करण्यात गुंतली आहेत. पापक्षालनासाठी व मोक्षाच्या प्राप्तीसाठी आम्ही तीर्थात जाऊन वरून कातडी धूत आहोत, पण वरून कातडी धुतल्यानंतर आतून केलेले पाप धुऊन जाते हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. म्हणूनच देहू गावचे धगधगते चालते ज्ञानबिंब तुकोबारायांनी एक विवेकवादी प्रश्न विचारला होता -जाऊनियां तीर्था काय तुवा केले ?चर्म प्राक्षाळीले वरी-वरी ।आंतरिचे शुद्ध कासयाने झाले ?भूषण त्वा केले अपण पया ।तीर्थाटनात जाऊन दाढी आणि डोके भादरून घेणाºया मंडळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी मनात विवेक निर्माण होत नाही की, अंतरंगात जर पापाची कोडी भरली असेल तर वरून दाढी करून काय करायचे? वरून कातडी धुतल्यानंतर आतले मन कधी शुद्ध होत नाही, त्यापेक्षा मथुरा, द्वारका, काशी ही सारी तीर्थक्षेत्रे आपण आपल्या मनातच निर्माण करायची आहेत. तर सद्, चित् आनंदाची अनुभूती मिळायला वेळ लागणार नाही.- प्रा. शिवाजीराव भुकेले