शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

समाधान कशात आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 3:02 PM

मन विचार आणि काय तर अपेक्षाच कारण तोच विठ्ठल त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून त्याला सुखी समाधानी करू शकतो.

एखादी गोष्ट देऊन कीवा एखाद्याला ते बोलून जर त्या एखाद्या व्यक्तीचं माझे भरत नसेल तर ती व्यक्ती समाधानी नाही अस म्हटले जाते हो ना? वास्तविक पाहता समाधानी ह्या जगात कुणीच नाही तस, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या बाबतीत कमतरता ही आहेच पण म्हणून ती व्यक्ती मुळीच समाधानी नाही असा होत नाही ना... कुणी मोठे थोर म्हणून गेले की,आहे त्यात समाधान मानावं... आणि आहे तेवढ्यातच समाधान मानायचे म्हणजे अजून काही मिळवण्याचा प्रयत्नच करायचा नाही का? अस ही बोलल्या जाते.. मग काय जग दोन्ही बाजूंनी बोलते बघा... आपण फक्त दोन्ही बाजू बघायच्या असतात आणि त्यातील एक धरून चालायची..! कारण दोन्ही तबल्यावर हाथ ठेवल्यास आपल्याच मनाचा गोंधळ उडतो... बरं मग समाधान आहे तरी कशात हो ? ह्यात ना अनेक गोष्टींची सांगड घातली जाते. आपले विचार, आपले मन, आपल्या अपेक्षा.... ह्या सगळ्याची गुंफली जाणारी साखळी म्हणजे समाधान!! एकादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला भरपूर जवळची असते... तेव्हा अर्थातच आपण त्या व्यक्ती मध्ये काही तरी सतत बघत असतो... कुणीतरी सहज म्हणून जातं तू समाधानी नाहीय.... का म्हटल्या जाते बर कारण असमाधानी असल्याचा पुरावा आपणच तर त्यांना देतो ना म्हणून... पण त्या सहज बोलणाऱ्या व्यक्तीला मी सांगू इच्छिते की समाधानी नाही अस सहज बोलल्या जात पण तुम्हाला माहिती का ती व्यक्ती समाधानी का नाही तर..? त्या व्यक्तीला तुम्ही प्रिय असता बर का, तेव्हा तुमच्यात गुंतलेली ती व्यक्ती विचार करते स्वतःच्याच मनाचा, ज्यात ती तुमच्या कडून काही अपेक्षा ठेवते.(अपेक्षा ठेवणं चुकीचं तर नाही, आपल्या माणसानं कडूनच ठेवल्या जातात त्या..) सांगड घातली जाते ती विचार, मन, आणि अपेक्षांची... जेव्हा ह्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा माणसाला समाधानी असल्या सारखं वाटतं नाही... तेव्हा फार वैचारिक वागणारे आपण त्याच व्यक्तीला तू समाधानी नाही म्हणून त्यांच्यातील चूक दाखून अपेक्षाच नको असच सांगू पाहतोय जणू.... बरं नसतात काही लोक समाधानी कारण त्यांच्या अपेक्षांची पातळी उंच असावी म्हणून... मग त्या लोकांनी एकतर ती पातळी कमी करावी एकतर त्या पातळीवर समोरच्याच मन जपायला पाहिजेत... इथे त्या वैचारिक दृष्टिकोनातून बघितला तर तुमच्या त्या व्यक्तीला अपेक्षा ठेवन्या पासून दूर करावं की आपण होईल तेवढं पूर्ण करावं... फार नसते अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फक्त जाणून घेऊन करायच्या असतात... समाधान एक हेही आहे की अपेक्षांचं ओझा न ठेवता वागावं...जिथं फक्त प्रेमाची देवाणघेवाण होईल..निर्मळ असत ते स्वच्छ पाण्या सारखं निथळ नातं... पण मानवी जीव तो कसली न कसली अपेक्षा करतोच..आणि पूर्ण नाही झाली की चिडतो रागावतो स्वतःला त्रास करून घेतो... तेव्हा तो समाधानी नसतो म्हणजे सुखी नसतो.. पण ह्या ना त्या गोष्टीच्या अनुभवाला चाखत असतो.. घरात फार मोठा सोनं आहे म्हणून पण तो समाधानी नाही..! अन घरात आज चुलच पेटली नाही म्हणून तोही समाधानी नाही..! सुख समाधान नांदणारी ती लक्ष्मीच (positivity) जर आपल्या घरात, मनात नांदत नाही तर कसले आले हो समाधान... समाधान शोधायचं असेल तर फक्त एक भावना जपायल हवी ती म्हणजे समोरच्याला समजून घेणं.. त्याला तुम्ही महत्वाचे असाल तर त्याला आनंदी ठेवणं...तुमच्या मुळे जर समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर अचुकच तुमच्या वागण्याने तो समाधानी आहे आणि तोही तुम्हाला तेवढंच जपेल... विठू माऊलीच एक भक्तीगीत आहे छान नाम तुझे घेता देवा, होई समाधान| तुझ्या पदी लागो माझे तन मन जान|| काय हो हा सुंदर मुखडा त्या गीताचा ज्यात असा म्हणतात की त्या नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्ताला विठू माऊलीचा नाव घेता समाधान मिळत... का? तर त्या विठू माऊलीच्या पाऊला वरच त्या भक्तच तन मन आणि जीव लागतो... गुंफण आलीच बघा मन विचार आणि काय तर अपेक्षाच कारण तोच विठ्ठल त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून त्याला सुखी समाधानी करू शकतो... त्या भक्ताला दान म्हणून मोक्ष ही मिळून देऊ शकतो.. जगाचा सूत्रधार आहे तो विठू माऊली त्याकडे एक भक्त अपेक्षा ठेवतोच...ती म्हणजे मला समाधानी ठेव... देवापुढे नमस्कार करताना आपण हेच म्हणतो सुखी समाधानी ठेव देव बाप्पा मला व माझ्या कुटुंबाला.. मग आता समाधान मिळवायला दोन ही बाजू समर्थ हव्या एक समाधानी ठेवायला आणि एक त्यात समाधान मानायला... डॉक्टर तुमचा आरोग्य नीट आहे सांगतो म्हणून तुम्ही आरोग्यदायी राहता. (तो समाधान देतो म्हणून तुम्ही समाधानी आहात) बाबा कमावतो आणि तुम्हाला हव्या त्या तुमच्या गरजा पुरवतो आणि आई घरात जेवण बनवते तुम्हाला जपते तुमची सगळ्यांची काळजी घेते म्हणून तुम्ही आनंदी आहात. (ते समाधानात ठेवतात म्हणून तुम्ही समाधानी आहात) पण तुम्ही काहीच करत नाही तुमच्यात काही स्पूर्तीच नाही कशाची, तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. अर्थात काय तूम्ही स्वतःला आनंदात ठेवणं फार गरजेचं तरच तुम्ही समाधानी राहू शकता.. आयुष्य आनंद हा फार कमी उरलाय लोकांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो असमाधानी आहे.. लोक दुसऱ्याकडून आनंद शोधून समाधानी होण्याच्या प्रयत्नात असतात मी म्हणेल तुम्ही दुसऱ्याला आनंदी ठेऊन अधिक समाधानी होऊ शकता... सुख हे पाहण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे ते अनुभवायला जमलं की तुम्ही समाधानी आहात... आणि तुमच सुख हे कशात आहे हे तुम्हाला ठाऊक असायलाच हवा... मुलांचे सुख जर त्याच्या आईवडिलांचा आनंदात असेल तर त्या मुलांनी त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच ते समाधानी आहेत.. नवरा बायकोचे सुख जर एकमेकांच्या स्वप्न पूर्तीत असेल तर त्यांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यानेच ते आनंदी सुखी समाधानी होऊ शकतात.. भुकेल्या अन्न तहानलेल्या पाणी अज्ञानाला ज्ञान आणि आपल्या माणसाला साथ ह्या गोष्टी जरा अचूक झाल्या तर समजा समाधान आले...

- मिनल किशोर दही, रा.नांदखेड ता.अकोट जि.अकोला

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक