शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आनंद तरंग; प्रकटे आत्माराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:55 AM

मोठा काही नाट्यमय प्रसंग घडला असेल, तर केवढं रामायण घडलं, असं म्हणतो. एवढं रामायण ऐकलं, तरी प्रश्न काय तर म्हणे रामाची सीता कोण? असं आपण सहजपणे म्हणतो

शैलजा शेवडे

‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय. ‘राम’ शब्द असलेले किती वाक्प्रचार, शब्दसमूह आपण सहजपणे वापरतो. आपण एकमेकांना भेटलो की, ‘राम राम’ म्हणतो. सकाळच्या पहिल्या, प्रसन्न प्रहराला आपण ‘राम प्रहर’ म्हणतो. भरपूर कामे असतील, तर ‘रामरगाडा’ म्हणतो. एखाद्या गोष्टीत काही अर्थ राहिला नसेल, तर ‘त्यात काही राम नाही’ असं म्हणतो. व्यक्ती मृत पावली, तर त्या व्यक्तीने ‘राम म्हणलं’ असं म्हणतो. खारीच्या पाठीवरच्या पट्ट्यांना आपण ‘रामाची बोटं’ म्हणतो. मुंगूस दिसला आणि आपण त्याला ‘रामाची शपथ’ घातली, तर तो आपल्याला तोंड दाखवतो, अशी आपली श्रद्धा असते. एखाद्या गोष्टीला बाकी कुणी साक्षीदार नसला, तरी ‘राम’ सर्वसाक्षी आहे, त्याला माहीत आहे, या भावनेने ‘राम जाणे’ असं सहजपणे म्हणतो. ‘हे राम’ हा आपला सहजोद्गार असतो. हिंदीत ‘रामभरोसे’ हा शब्द वापरतात. कधी आपण ‘रामा शिवा गोविंदा’ म्हणतो. मोठा काही नाट्यमय प्रसंग घडला असेल, तर केवढं रामायण घडलं, असं म्हणतो. एवढं रामायण ऐकलं, तरी प्रश्न काय तर म्हणे रामाची सीता कोण? असं आपण सहजपणे म्हणतो. कष्टाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस आले की, वनवास संपला म्हणतो. भावंडांमध्ये प्रेम असेल, तर राम-लक्ष्मणाची जोडी असा उल्लेख करतो. राज्यकारभार उत्तम आणि जनहितार्थ असेल, तर त्याचा उल्लेख आपण ‘रामराज्य’ असा करतो. एखाद्या रोगावर नेमकं एखादं औषध अतिशय गुणकारी ठरलं, तो आजार निघून गेला, तर आपण ‘रामबाण’ औषध म्हणतो..रामाची कथा अत्यंत पतितपावन आहे...राम आपल्या अंतर्यामी आहे...घटाघटात, कणाकणात राम विराजित आहे...राम हृदयातला हुंकार आहे...राम एक नाद आहे...

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक