विवेकावांचुन वैराग्य आंधळे (भज गोविंदम -४)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:16 PM2020-05-21T20:16:11+5:302020-05-21T20:16:20+5:30

विवेक, वैराग्य,शमादिषटक, मुमुक्षत्व या चार घटकाला साधन-चतुष्टय म्हणतात. परमार्थात या चार गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. ज्याला खरा परमार्थ करायचा त्याला विवेक, वैराग्य असावेच लागते. बºयाच ठिकाणी असे दिसते. कधी विवेक आहे, तर वैराग्य नाही. किंवा वैराग्य आहे तर विवेक नाही. दोन्हीही असेल तरच परमार्थ सोपा होतो. नाही तर तर तो दांभिकपणाच समजला जातो.

Vivekavanchun Vairagya Andhale (Bhaj Govindam-4) | विवेकावांचुन वैराग्य आंधळे (भज गोविंदम -४)

विवेकावांचुन वैराग्य आंधळे (भज गोविंदम -४)

googlenewsNext

  अग्रे वन्हि: प्रुष्ठे भानू रात्रौ चुबुकसमर्पितजानु:।
  करतलभिक्षा तरुतलवासस्तदपि न मुंचत्याशापाश:॥४ 
 भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते.... ॥ध्रु॥


विवेक, वैराग्य,शमादिषटक, मुमुक्षत्व या चार घटकाला साधन-चतुष्टय म्हणतात. परमार्थात या चार गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. ज्याला खरा परमार्थ करायचा त्याला विवेक, वैराग्य असावेच लागते. बºयाच ठिकाणी असे दिसते. कधी विवेक आहे, तर वैराग्य नाही. किंवा वैराग्य आहे तर विवेक नाही. दोन्हीही असेल तरच परमार्थ सोपा होतो. नाही तर तर तो दांभिकपणाच समजला जातो.

माऊली म्हणतात,

विवेकावांचुन वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगळे । जेवि ध्रुतराष्ट्रा जेष्ठत्व आले । परि नेत्रविण गेले । राज्य पै ॥

विचारावांचुन धारण केलेले वैराग्य अहंकार निर्माण करते. शिवाय योग्य मार्ग कळत नाही. माणूस भरकटला जातो. घरदार सोडून वनात, डोंगरात, कुठेतरी दूर अरण्यात जाणे म्हणजे परमार्थ. असे तो समजू लागतो. अशा वेडगळ समजुतीत तो घरादाराचा त्याग करतो. हा विचाराशिवाय केलेला त्याग असतो. त्याग तरिसा करा। अहंकाराते दवडावे ॥  श्री. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे खरा त्याग हा अंतरिक असतो. अंत:करणातून वासना, आसक्ति, आशा हे सर्व गेले पाहिजे. पण असे न होता बाह्य अंगालाच महत्व येते व तोच परमार्थ समजला जातो. आशा ही समूळ खाणोनी काढावी । तरिच गोसावी व्हावे तेणे ॥  मनातील अपेक्षा गेली पाहिजे. सकामता गेली तरच साधू होता येते. नाही तर तो फक्त संधिसाधू बनतो. जे त्यागायाचे ते त्यागलेले नसते. फक्त वैराग्याचा अभास मात्र निर्माण करतो. असा साधू  दु:खी होतो. त्यागायाची वस्तू नाही त्यागियेली । वरि वरि दाविली विरक्ति ते ॥  (चुडालाख्यान) असेच एका ढोंगी माणसाने खºया संन्याशाप्रमाणे त्याग केला. जसे  खरा संन्याशी निष्काम, निश्चळ, दृढ विश्वास, सर्व जगावर प्रेम करणारा असतो. करतल भीक्षा म्हणजे हाताच्या तळव्यावर जेवढी भीक्षा मिळेल तेवढीच भक्षण करायाची. नाही तर उपवास करायचा. घर, मठ, आश्रम, संस्था असे काहीच बांधायचे नाही. उलट ‘तरुतल वास :’ झाडाखाली राहायचे हा खरा संन्याशी. पण होते काय? घर, प्रपंच, मुले-बाळे सर्वांचा त्याग विवेकाशिवाय करतो. पण एकच पाश त्याला असा काही बध्द करतो की तो त्याच्यातून सुटता सुटत नाही. तो पाश म्हणजे ‘आशापाश’. आशा देवालाही लहान बनवते. आशेच्या पोटात सर्व वासना लपलेल्या असतात. कितीही कठोर साधना करु द्या पण ! जर आशा नष्ट झाली नाही तर त्याचे पतन होते व जगात हसू होते. ‘भुक्तये न तू मुक्तये’ अशी त्याची अवस्था होते.  आचार्य म्हणतात, पुढे अग्नि(शेकोटि),पाठीवर सुर्याचे कडक उन,(यालाच पंचाग्निसाधन सुध्दा म्हणतात). रात्री गुडघ्यात डोके घालून अंगाचे मुटकुळे करुन बसतो. भीक्षा मागण्यासाठी हाताचे तळवे आणि राहायला एका झाडाखाली राहणे इतका हा अपरिग्रह आणि विरक्त!  पण एवढे असुनही सर्व पाशमुक्त होऊनही, घरादाराचा त्याग करुनही हा आशेच्या पाशातून मात्र मुक्त होत नाही.  


श्रीमद्भागवतात दुसºया स्कंधात श्री. शुकाचार्य म्हणतात, अजून नद्यांनी वाहण्याचे बंद केले नाही. झाडांनी फळे देण्याचे बंद केले नाही. सावली देण्याचे बंद केले नाही. अंगाला झाडाची सालही गुंडाळली तरी चालते. मग लोक या श्रीमंत लोकांची चापुलसी (चमचेगीरी) का करतात.? फक्त आशेपोटी हे सगळे घडते. अंत:करणातील आशा म्हणजे एखाद्या ओढाळ गुरासारखे आहे.


बहिणाबाई फार सुंदर सांगतात-


मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर ।
किती हाकलं हाकलं पुन्ना येई पिकावर॥


मनाचे उन्मन झाले की मग मात्र या मनात आशा उत्पन्न होत नाही.दु:ख राहाणर नाही. हा खरा संन्याशी.

माऊली म्हणतात,

मी माझेसी आठवण । विसरले जयाचे अंत:करण ।पार्था तो संन्याशी जाण । निरंतर ॥

ज्याच्या अंत:करणात मी-माझेपणा राहिला नाही तो कोणत्याही आश्रमात म्हणजेब्रह्मचारी असो, ग्रुहस्थी असो तो संन्याशीच असतो. श्री. तुकाराम महाराज म्हणतात,काम क्रोध बंदिखानि। तुका म्हणे दिले दोन्ही।इंद्रियाचे धनी ।आम्हि झालो गोसावी ॥ हे खरे त्यागाचे लक्षण आहे.आचार्य म्हणतात,‘ हे  मानवा ! तुला त्याग, वैराग्य हे जरी नाही कळले तरी तूगोविंदाचे भजन कर. या नामसाधनेनेच तुझा उध्दार झाल्याशिवाय राहाणार नाही.

भज गोविंदम् भज गोविंदम् भज गोविंदम मुढमते.


-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले 
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी(पा.)ता. अहमदनगर

Web Title: Vivekavanchun Vairagya Andhale (Bhaj Govindam-4)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.