अलिबागच्या मुनवली तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

By निखिल म्हात्रे | Published: June 23, 2024 05:21 PM2024-06-23T17:21:13+5:302024-06-23T17:21:22+5:30

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी मूनवली येथील तलावात उतरले होते

Two drowned in Alibaug Munwali lake  | अलिबागच्या मुनवली तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

अलिबागच्या मुनवली तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

अलिबाग - तालुक्यातील मूनवली येथे तलावात दोन मुलं बुडाल्याची घटना रविवारी घडली आहे. दोघाही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मूनवली येथील अथर्व शंकर हाके वय अंदाजे १६ वर्षे असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून दुसरा तुडाळ भागातील मुलगा असून त्याचे नाव शुभम विजय बाला असे आहे. ते दोघे रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी मूनवली येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.  ही बाब नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी तलावात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. साधारण आडीच तिन तासानंतर त्यांना या दोघांचे मृतदेह सापडले.

Web Title: Two drowned in Alibaug Munwali lake 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.