Tulsi Vivah 2020:  'या' ८ मंगलाष्टकांनी करा तुळशीचं लग्न; दूर होतील विघ्न, जाणून घ्या मुहूर्त

By Manali.bagul | Published: November 24, 2020 07:52 PM2020-11-24T19:52:47+5:302020-11-24T19:53:57+5:30

Holy Basil Prabodhini Ekadashi: घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी.

Tulsi Vivah 2020: Get married to these 8 Mangalashtaks; Obstacles will be removed, know the importance | Tulsi Vivah 2020:  'या' ८ मंगलाष्टकांनी करा तुळशीचं लग्न; दूर होतील विघ्न, जाणून घ्या मुहूर्त

Tulsi Vivah 2020:  'या' ८ मंगलाष्टकांनी करा तुळशीचं लग्न; दूर होतील विघ्न, जाणून घ्या मुहूर्त

googlenewsNext

तुळशीचं लग्न अवघ्या दोन  दिवसांवर येऊन ठेपलं. दिवाळी झाली की  तुळशीच्या लग्नाची प्रतिक्षा सगळ्यांनाच असते.  घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला तुळशी विवाहाच्या वेळी म्हणायच्या मंगलाष्टकांबद्दल सांगणार आहोत. 

Tulasi vivah 2020: Tulsi wedding moments, dates and rituals | Tulasi vivah 2020 : तुलसी विवाह मुहूर्त, तिथी आणि विधी

तुलसी विवाहाची तारीख:

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. २५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हणतात. तिचा दुसरा दिवस द्वादशीचा. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुलसी विवाह करता येतो. त्यातही काही शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत-

एकादशी प्रारंभ २५ नोव्हेंबर मध्यरात्री २.४५ पासून सुरू

एकादशी समाप्त २६ नोव्हेंबर सकाळी ५.१० मिनीटांपर्यंत

द्वादशी प्रारंभ २६ नोव्हेंबर सकाळी ५.१० मिनीटांपासून

द्वादशी प्रारंभ २७ नोव्हेंबर सकाळी ७.४६ मिनीटांपर्यंत

 तुळशी-शाळीग्राम विवाहादरम्यान पठण करावयाची ८ मंगलाष्टके

१- ॐ श्री मत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुमर्हेन्द्रोऽनलः। चन्द्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रताधिपादिग्रहाः। प्रद्यम्नो नलकूबरौ सुरगजः, चिन्तामणिः कौस्तुभः, स्वामी शक्तिधरश्च लांगलधरः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

२- गंगा गोमतिगोपतिगर्णपतिः, गोविन्दगोवधर्नौ, गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः। गायत्री गरुडो गदाधरगया, गम्भीरगोदावरी, गन्धवर्ग्रहगोपगोकुलधराः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

३- नेत्राणां त्रितयं महत्पशुपतेः अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम्। गंगावाहपथत्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राह्मणम्, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुवर्न्तु वो मंगलम्॥

४- बाल्मीकिः सनकः सनन्दनमुनिः, व्यासोवसिष्ठो भृगुः, जाबालिजर्मदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः। मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपो नलः, पुण्यो धमर्सुतो ययातिनहुषौ, कुवर्न्तु वो मंगलम्॥

५- गौरी श्रीकुलदेवता च सुभगा, कद्रूसुपणार्शिवाः, सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती। स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी, वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुवर्न्तु वो मंगलम्॥

६- गंगा सिन्धु सरस्वती च यमुना, गोदावरी नमर्दा, कावेरी सरयू महेन्द्रतनया, चमर्ण्वती वेदिका। शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गण्डकी, पूर्णाः पुण्यजलैः समुद्रसहिताः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

७- लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा, गावः कामदुघाः सुरेश्वरगजो, रम्भादिदेवांगनाः। अश्वः सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे, रतनानीति चतुदर्श प्रतिदिनं, कुवर्न्तु वो मंगलम्॥

८- ब्रह्मा वेदपतिः शिवः पशुपतिः, सूयोर् ग्रहाणां पतिः, शुक्रो देवपतिनर्लो नरपतिः, स्कन्दश्च सेनापतिः। विष्णुयर्ज्ञपतियर्मः पितृपतिः, तारापतिश्चन्द्रमा, इत्येते पतयस्सुपणर्सहिताः, कुवर्न्तु वो मंगलम्॥

विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो.

Web Title: Tulsi Vivah 2020: Get married to these 8 Mangalashtaks; Obstacles will be removed, know the importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.