Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 16 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 07:14 IST2019-07-16T07:14:18+5:302019-07-16T07:14:36+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 16 जुलै 2019
आज जन्मलेली मुलं- आज जन्मलेली २७ क. १५ मि. पर्यंतची मुले धनु राशीत असतील. त्यापुढे मुले मकर राशीत प्रवेश करतील. शुक्र, गुरु अशुभ योगामुळे स्थिर प्रगतीसाठी संयम शिस्त यांचा उपयोग करावा लागेल. अपरिचित व्यक्ती, कार्य, संस्था यामध्ये सावध राहाणे आवश्यक राहील. धनु राशी भ, ध, मकर ज, ख अद्याक्षर.(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
मंगळवार, दि. १६ जुलै २०१९
भारतीय सौर २५ आषाढ १९४१
मिती आषाढ शुद्ध पोर्णिमा २७ क. ८ मि.
पूर्वाषाढा नक्षत्र २० क. ४३ मि. धनु चंद्र २७ क. १५ मि.
सूर्योदय ०६ क. ११ मि., सूर्यास्त ०७ क. १८ मि.
गुरुपौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण, व्यासपूजा
आजचे दिनविशेष
१९०९ - स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न अरुणा आसफ अली यांचा जन्म
१९१४ - प्रसिद्ध मराठी कथाकार विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वामन कृष्ण चोरघडे यांचा नरखेड, जि. नागपूर येथे जन्म
१९१७ - आधुनिक हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथूर यांचा जन्म
१९६८ - भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान धनराज पिल्ले यांचा जन्म
१९८४- प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा जन्म
१९८६ - प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेव सीताराम उर्फ वा. सी. बेंद्रे यांचे निधन