Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 19 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:49 IST2020-03-19T07:49:10+5:302020-03-19T07:49:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 19 मार्च 2020
आज जन्मलेली मुलं - मकर राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-शनि शुभयोगाचे मिळणारे सहकार्य कर्तृत्वसंपन्नता निर्माण करणारी राहील. त्यातून शिक्षण, अधिकार, उद्योग अशी केंद्र प्रभाव निर्माण करतील. समाजाशी संपर्क राहील. माता-पित्यास शुभ. मकर राशी ज, ख अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार दि. १९ मार्च २०२०
भारतीय सौर २९ फाल्गुन १९४१
मिती फाल्गुन वद्य एकादशी, अहोरात्र
उत्तराषाढा नक्षत्र १४ क. ५० मि., मकर चंद्र
सूर्योदय ०६ क. ४५ मि., सूर्यास्त ०६ क. ४८ मि.
पापमोचनी स्मार्त एकादशी
आजचे दिनविशेष
१८७६ - मोहेंजोदडो व तक्षशीला या स्थळांचा सुप्रसिद्ध उत्खननक सर जॉन ह्युबर्ट मार्शल यांचा जन्म
१८८४ - प्रसिद्ध गणितशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व सृष्टिशास्त्रज्ञ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन
१८९२ - संस्कृत आणि मराठी काव्याचे चिकित्सक, संग्राहक व संपादक जनार्दन बाळाजी मोडक यांचे पुणे येथे निधन
१९३८ - नाटककार, लेखिका, नाट्यसिने दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म
१९८२ - स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आचार्य जीवतराम भगवानदास कृपलानी यांचे निधन
१९८४ - हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा जन्म
२००२ - माजी क्रिकेटपटू नरेन ताम्हाणे यांचे निधन