Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 28 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 12:19 IST2019-04-28T10:57:52+5:302019-04-28T12:19:52+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 28 एप्रिल 2019
आज जन्मलेली मुलं
15 क. 45 मिनिटपर्यंत जन्मलेली मुलं मकर राशीची असतील. त्यानंतर जन्मलेली मुलं कुंभ राशीत जन्म घेतील. परिश्रम आणि कल्पकता यामधून कार्यभाग साधणारी ही मुलं असतील. बौद्धिक क्षेत्रात चमकतील. उद्योगात यश मिळवतील. मकर राशी - ज, ख, कुंभ राशी - ग. स, अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचाग
रविवार, दि. 28 एप्रिल 2019
भारतीय सौर 08 वैशाख 1941
मिती चैत्र वद्य नवमी 19 क. 34 मि.
धनिष्ठा नक्षत्र 29 क. 17 मि., मकर चंद्र
सूर्योदय 06 क. 14. मि, सूर्यास्त 06 क. 59 मि.
दिनविशेष
1740 - थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन
1898 कवी संस्कृत साहित्याचे भाषांतरकार गणेश सदाशिवशात्री लेले यांचे निधन
1933 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म