Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Saturday, November 9, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 नोव्हेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेल्या मुलांची मीन राशी असेल. शनि-नेपच्यून शुभयोगामुळे विचार वेगवान होतील. कर्तुत्व प्रकाशमान होईल. चंद्र-शुक्र नवपंचमयोगामुळे त्यात आधुनिकता राहील. कला, संगीत अशा विभागाशी संपर्क येतील. मीन राशी द. च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

 • शनिवार, दि, ९ नोव्हेंबर २०१९
 • भारतीय सौर, १८ कार्तिक १९४१
 • मिती कार्तिक शुद्ध द्वादशी १४ क. ४० मि. 
 • उत्तरा भाद्रपदा नक्षत्र १४ क. ५६ मि., मीन चंद्र
 • सूर्योदय ०६ क. ४४ मि., सूर्यास्त ०६ क. ०१ मि. 
 • शनि प्रदोष/तुलसी विवाहारंभ 

 

आजचे दिनविशेष 

 • १८७७ - भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या सारे जहॉंसे अच्छाचे कवी मोहम्मद इक्बाल यांचा जन्म
 • १९२४ - ख्यालगायक पंडित सी. आर. व्यास यांचा जन्म
 • १९६२ - भारतरत्न पुरस्काराने गौरविलेल्या धोंडो केशव कर्वे यांचे निधन
 • १९६७ - मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे निधन
 • १९७७ - संगीतकार, लेखक केशवराव भोळे यांचे निधन
 • २००५ - राष्ट्रपती के. आर नारायणन यांचे निधन 
 • २०११ - भारतीय वैज्ञानिक नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराणा यांचे निधन  
Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Saturday, November 9, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.