Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, १ फेब्रुवारी २०२०
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 07:57 IST2020-02-01T07:57:30+5:302020-02-01T07:57:48+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, १ फेब्रुवारी २०२०
आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र हर्षल युतीमुळे चमत्कारीक विचारांची असून संयम संस्काराच्या नियंत्रणामुळे त्यांच्यातील प्रगलभता विकसित होऊ शकेल आणि कर्तृत्व प्रकाशमान करणारे यश मिळू शकेल, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२०
भारतीय सौर १२ माद्य १९४१
मिती माद्य शुद्ध सप्तमी १८ क. ११ मि.
अश्विनी नक्षत्र २० क. ५३ मि. मेष चंद्र
रथसप्तमी
सूर्योदय ०७ क. १४ मि. सूर्यास्त ०६ क. ३० मि.
आजचे दिनविशेष
१८९४ - संस्कृत कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म
१९०७ - मुमुक्षुपत्र साप्ताहिक स्वरुपात संत वाड्मयाचे उपासक ल. रा पांगारकर यांनी सुरु केले
१९२७ -प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. म, द हातकणंगलेकर यांचा जन्म
१९२९ - ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म
१९४४ - सुप्रसिद्ध पत्रकार अरुण टीकेकर यांचा जन्म
१९५८ - चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ याचा जन्म
१९७१ - क्रिकेटपटू अजय जडेजा याचा जन्म
१९९५ - नाटककार मो. ग. रांगणेकर यांचे निधन
२००३ - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन