Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 11 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 07:15 IST2019-05-11T07:15:21+5:302019-05-11T07:15:50+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 11 मे 2019
कर्क राशीतील आजची मुले गुरुकृपेने अनेक प्रातांत चमकतील आणि रवि-शनि नवपंचम योग यांत्रिक, विज्ञान, अधिकार यामधून पुढे घेऊन जाईल. संस्कारातून सफलता महत्त्वपूर्ण ठरेल. जन्मनाव ड, ह अक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार, दि. 11 मे 2019
भारतीय सौर 21 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध सप्तमी 19 क.45 मी
पुष्य नक्षत्र 13 क. 13 मि. कर्क चंद्र
सूर्योदय 06 क. 7 मि., सू्र्यास्त 07 क. 3 मि.
गंगोत्पती-गंगापूजन
आजचे दिनविशेष
1878 - मराठी ग्रंथकारांचे पहिले अधिवेशन
1885 - बंगालच्या प्रबोधन काळातील एक प्रमुख लोकनेते, निबंधकार व पत्रकार कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचे निधन
1895 - विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म
1946 - कृत्रिम हद्य विकसित करणारे कार्डीओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म
1950 - प्रसिद्ध अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म
1956 - अमेरिकन ज्योतिर्विद वॉल्टर सिडनी अँडम्स यांचे निधन
1993 - मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन
2004 - नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार चित्रकार कृष्णदेव बिंदुमाधव मूळगुंद यांचे निधन