Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 21 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 08:12 IST2020-01-21T07:37:07+5:302020-01-21T08:12:27+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 21 जानेवारी 2020
आज जन्मलेली मुलं - २३ क. पर्यंत मुले वृश्चिक राशीत असतील, त्यानंतर गुरुच्या धनु राशीत प्रवेश करतील. प्रयत्न ते सफलता असा त्यांचा व्यवहार राहील. जिद्द आणि सात्त्विकता त्याची केंद्र राहतात. संपर्क चांगले राहातील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी, भ, ध, अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
मंगळवार दि. २१ जानेवारी २०२०
भारतीय सौर, ०१ माद्य १९४१
मिती पौष वद्य द्वादशी २५ क. ४५ मि.
ज्येष्ठा नक्षत्र २३ क. ४३ मि. वृश्चिक चंद्र २३ क. ४३ मि.
सूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २४ मि.
आजचे दिनविशेष
१८८२ - कांदबरीकार, साहित्य समीक्षक वामन मल्हार जोशी यांचा जन्म
१८९४ - प्रख्यात कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन यांचा जन्म
१९१० - गीतकार, लेखक व दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा जन्म
१९२४ - माजी केंद्रीय मंत्री, समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांचा जन्म
१९४५ - क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे निधन
१९६५ - प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांचे निधन
१९७२ - मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.