Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 07:25 IST2019-09-06T07:24:27+5:302019-09-06T07:25:00+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019
आज जन्मलेली मुलं - 28 क. 28 मि. पर्यंत वृश्चिक राशीतील मुले असतील. पुढे मुले धनु राशीत प्रवेश करतील. जिद्द आणि सात्त्विकता यांचे व्यवहारात प्रयोग सफल करतील. रवि-शनि नवपंचम योग काही अधिकारही मिळवून देईल. कार्यवर्तुळ व्यापक होत राहतील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी भ, ध, आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शुक्रवारी दि. 6 सप्टेंबर 2019
भारतीय सौर 15 भाद्रपद 1941
मिती भाद्रपद शुद्ध अष्टमी 20 क. 43 मि.
ज्येष्ठा नक्षत्र 28 क. 58 मि., वृश्चिक चंद्र 28 क. 58 मि.
सूर्योदय 06 क. 26 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
दुर्गाष्टमी गौरी पूजन
आजचे दिनविशेष
1881 - स्वातंत्र्य सेनानी बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म
1901 - भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म
1929 - भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचा जन्म
1965 - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
1971 - भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म
1972 - सुप्रसिद्ध सरोदवादक अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन